मनश्री - सुमेध वडावाला (रिसबूड)



मनश्री सोमण. जन्मतः च दृष्टिहीन. देव सुद्धा अशा काही चुका करतो कि मानवाचं science ही त्या सुधारू शकत नाही. आठव्या महिन्यातच जन्माला आली ती. premature, with cleft lips, न जुळलेल्या vertebrae मुळे जन्मतः च आखूड मान,… तिला जन्म दिलेल्या तिच्या माउली वर काय आघात घडले असतील तीच जाणो.
अशा सगळ्या दिव्यातून मनश्री 'जगली', खर आयुष्य जगली. स्पर्शातून तिने जग 'पाहिलं'. एवढ असूनही ती म्हणते - "आपण किती 'लक्की' आहोत कि इतरांना विचारत - विचारत, हाताच्या अंदाजाने आपल्याला चालता तरी येतय." प्रत्येक गोष्टीत तक्रार करणाऱ्या डोळस माणसांनी शरमेने मान खाली घालावी, असा तिचा 'दृष्टीकोन'.
खरतर तिच्या प्रत्येक यशात खरा वाटा तिच्या आई-वडिलांचा तसेच बहिण आणि आजी-आजोबांचा पण आहे. त्यांनीच तिला स्वतः च्या पायावर उभं राहायला, त्यांच्या दृष्टीतून जग पाहायला शिकवलंय.
अशा या 'बालश्री' मिळवलेल्या मनश्री ची कहाणी वाचताना थक्क व्हायला होतं, ऊन - पावसाचे खेळ वाचकाच्या चेहऱ्यावर दिसतात. आणि मनश्री चं आवडतं गाण आपल्या कानात गुणगुणू लागतं -
'या जन्मावर, या जगण्यावर…
शतदा प्रेम करावे…. '

From My Book Shelf : https://www.facebook.com/photo.php?fbid=10204500974915610&l=8327e4cc31

BookGanga : http://www.bookganga.com/eBooks/Books/details/5754662299621198723?BookName=Manshree


Comments

Popular posts from this blog

एकेक पान गळावया - गौरी देशपांडे

गोफ - गौरी देशपांडे

बारा कथा ~ वि. वा. शिरवाडकर