रथचक्र - श्री. ना. पेंडसे



आपल्या पोटच्या मुलांनी शिकावं, त्यांना समाजात मानाने जगता यावं; यासाठीच केवळ आपलं आयुष्य वाहून घेणाऱ्या 'आई' ची ही कहाणी. 
संन्यासी नवरा, त्रासदायक दीर - जावा या सगळ्या कचाट्यातून एकटी बाहेर पडून ती मुलाला शिक्षण देते परंतु खस्ता खाऊनही आयुष्याच्या शेवटी आत्महत्येशिवाय तिचाकडे कोणताच पर्याय उरत नाही.
कादंबरी ही नेहमी खऱ्या आयुष्याचं प्रतिनिधित्व करते हे माहित असूनसुद्धा चित्रपटाप्रमाणे HAPPY ENDING ची सवय लागलेल्या मनाला 'रथचक्र' चा शेवट चटका लावून जातो. 
'गारंबीच्या बापू'स तोडीस तोड कादंबरी म्हणता येईल.

From My Book Shelf : https://www.facebook.com/photo.php?fbid=10204839525499163&l=9e0032b9ba

BookGanga : http://www.bookganga.com/eBooks/Books/details/5450274793712697998?BookName=Rathchakra


Comments

Popular posts from this blog

एकेक पान गळावया - गौरी देशपांडे

गोफ - गौरी देशपांडे

बारा कथा ~ वि. वा. शिरवाडकर