Lecture!




काल संध्याकाळी भावंडांबरोबर खाडी वर फिरायला गेलो. सगळीच लहान पोरं मस्त मजा - टाईमपास चालू होता. श्रावण संपत आला होता त्यामुळे मासे पकडायला होड्या, तर नांगर टाकून लावलेल्या होत्या. आता पुन्हा खवैयांची चंगळ सुरु
ओहोटी लागली होती त्यामुळे कमी पाण्यात मासे वरती आलेले दिसत होते. कावळे -  बगळे तरंगत्या पाण्यातले मासे पकडण्यात आपलं कसब पणाला लावत होते. कावळे तर मासा मिळाला कि चोचीत अथवा पायात पकडून मस्त उडत आपल्या आवडत्या ठिकाणी बसून मेजवानी वर ताव मारत होते कावळा उडत असताना त्याने चोचीत पकडलेल्या माश्याची फडफडणारी शेपटी पण दिसत होती गुलाबी-शेंदरी रंगाचे खाडीचे मासे ओहोटी ला पाण्यावर येतात, पिठोरी जवळ आली होती ना
आमच्यासारखी खूप लोकं तिथे फिरायला आलेली होती. अशीच पक्ष्यांच्या करामती पाहत मजा करत होती.
परंतु तिथे आलेल्या एका ग्रुप ने तेवढ्यात सगळ्यांचच लक्ष वेधून घेतलं
८-९ पुरुषांचा ग्रुप असेल. त्यांच्यामध्ये एक १२-१३ वर्षांचा मुलगा पण होता. त्यांचा वागण्यावरून थोडे मवालीच वाटत होते सगळे. (कोणत्याही धार्मिक / जातीय / प्रांतिक वादात पडण्याचा उद्देश नव्हे) परंतु ती लोकं मराठी नक्कीच नव्हते. बोलता-बोलता त्यांनी २-३ आईसक्रीम काढले आणि तसेच सगळे बोटाने खाऊ लागले. आईसक्रीम बॉक्स तसेच पाण्यात टाकले. तिथे असलेल्या आम्हा सगळ्यांनाच या कृतीचा राग येत होता पण त्यांच्या एकुणच वागण्यावरून कोण त्यांना बोलण्याची हिम्मत करणार
या सगळ्या कचऱ्याचा पाण्यातल्या जीवांवर काय परिणाम होणार आहे एवढा पण विचार करू नये.
आईसक्रीम कप चे covers त्यांनी असेच वाऱ्यावर भिरकावले ते तिथल्याच एका वयस्कर गृहस्थांचा तोंडावर उडाले परंतु त्याबद्दल त्या गलिच्छ माणसांना  काहीच वाटत नव्हतं.
तेवढ्यात त्यांचा ग्रुप मधल्या छोट्या मुलाने 'कुरकुरे' हातात घेतले अणि पाण्यातल्या माश्यांना खाऊ घालायला लागला

हे सगळ बघून डोकं सुन्न झालं होत. समोर सगळ घडत असूनही काहीच करू शकत नव्हते. मग विचार केला किती लोकांना social ethics शिकवत बसणार? या गोष्टी लोकांच्या वळणी कधी पडणार?

आपल्या देशात असा एक विशिष्ठ लोकांचा वर्ग आहे तिथे स्वच्छतेच महत्व पोहोचतच नाही आहे. या असल्या लोकांच population पण वाढत जातंय. ही लोक आपल्या पुढच्या पिढीला तरी काय शिकवणार???
आश्चर्य तर तेव्हा वाटत जेव्हा चांगली, सुशिक्षित, सुसंस्कृत लोकं सुद्धा लोकल च्या फर्स्ट क्लास डब्यात बसून खाल्लेल्या चोकोलेट चा कागद असाच बाहेर भिरकावून देतात. अशा बायकांना मी नेहमीच lecture देत असते. 
परंतु आता या ८-९ लोकांचा घोळक्यासमोर खरंच मी हतबल होते. कोणा-कोणाला lecture देणार???

तेवढ्यात पाण्यात लक्ष गेलं, 'कुरकुरे' खायला गुलाबी-शेंदरी रंगाचे मासे वेगाने एकत्र पोहत येत होते

25-AUG-2014

©SKG - CITY through My Eyes

Comments

Popular posts from this blog

गोफ - गौरी देशपांडे

एकेक पान गळावया - गौरी देशपांडे

भिन्न - कविता महाजन