नक्षत्रांची फुले


नक्षत्रांची फुले
आकाश आणि प्रकाशाच्या गोष्टी
लेखिका : दीपाली पाटवदकर



आकाशदर्शन इतक्या सहज सोप्या भाषेत कोणीच समजावलं नसेल. लेखिकेची विषय समजावण्याची सहज पद्धत चित्र ज्ञानेश्वरी च्या वेळीच लक्षात आली होती. परंतु आकाशदर्शन सारखा गहन विषय day to day life मधील examples शी निगडित असू शकतो हे 'नक्षत्रांची फुले' वाचून च लक्षात येत.
मुखपृष्ठावरील स्वतः भोवती असंख्य तारका लपेटून स्वतः मध्येच मग्न होऊन नाचणारी आकाशगंगा पाहून, 'बदन पे सितारे लपेटे हुए' गाण्याची आठवण होते (किंबहुना हे गाणं ऐकलं तर मला लेखिकेच्या आकाशगंगेची आठवण होईल यापुढे नेहमी...).
लेखिकेने २७ निरनिराळ्या उदाहरणातून आकाशाशी निगडित माहिती समजावलेली आहे. त्यातल्या मला जास्त आवडलेल्या कथा -
चंद्रा तुझी कोर कशी, समुद्र मंथन, उत्तर आकाश, हर हर गंगे (गंगा आणि आकाशगंगा यांची घातलेली सांगड तर उत्तम), हृदयी हरी नांदतो, आशिर्वाद(टिळकांच्या संदर्भात असल्यामुळे असेल कदाचित 😊).
आई मुळे मला आकाश निरीक्षणाची आवड लागलेली होती, आता या पुस्तकामुळे अजून गोष्टी clear झाल्या आहेत. आई नाहीये आता, तीला हे पुस्तक वाचायला खूप आवडल असतं...
'हृदयी हरी नांदतो' मधील लेखिकेचे विचार खूपच भावतात -
"एका वर्षांपूर्वी 'माझं शरीर' म्हणून ज्यावर प्रेम केले, ज्याचे लाड केले, त्यापैकी काहीच आता 'माझं' राहिलं नाही! तेच कण आता दुसऱ्या कोणत्या प्राण्याच्या शरीरात असतील. तेच कण कधी दूर भविष्यात, कुठल्याशा देशात, नवीन जन्मलेल्या पिल्लात असतील! मी असेन किंवा नसेन, पण माझे शरीरकण पुनर्जीवीत होऊन कुठे फुल कुठे सुगंध देतील तर कुठे नक्षत्र होऊन प्रकाश देतील!...
... कधी काळी जो कृष्णाचा उच्छवास होता, जो त्याच्या बासरीत घुमला, त्याच्या मोरपिसात भिजला, त्याच्या पायात घुटमळला, तो आज माझ्या हृदयात आहे!!! " 😍😍😍😇
- सुप्रिया घुडे

Comments

Popular posts from this blog

गोफ - गौरी देशपांडे

एकेक पान गळावया - गौरी देशपांडे

भिन्न - कविता महाजन