Wall Panting - Warali Painting


गेले एक दीड वर्षं फक्त मातीच्या रंगाचं background भिंतीवर रंगवून ठेवलं होतं. येता-जाता पावणे-रावळे सगळे विचारायचे, काय करायचं ठरवलंय इथे.. सगळंच गुलदस्त्यात.. त्यात घरात असे प्रसंग घडत होते की हातात brush घ्यायची इच्छा ही होत नव्हती..
या आधी एक wall painting हातात घेतलं होतं, तेव्हा brush तसंच ठेवून दिलं, त्यानंतर कधी आई आली तेव्हा रंगाने कडक झालेलं brush बघून खूप रागावली, म्हणे वडिलांकडून फक्त कला घेतली, थोडी अक्कल पण घ्यायची, बाबा बघ काम झालं की कसे रंग-brush, सगळ्या जागच्या जागेवर वस्तू..
मागच्या वर्षी बाबांच्या वर्ष श्राद्धाला घरच्या garden wall वर wall painting केलं होतं. रस्त्यावरून जाणारे सगळे विचारायचे आई ला, कोणाकडून करून घेतलं, आईला माझं कौतुक - "माझ्या मोठ्या लेकीने केलंय.."
.
.

शेवटी काल ठरवून हे रखडलेलं काम पूर्ण करायचं ठरवलं..
4 festivals of india in Warali ( वारली ) painting..
सलग चार तास लागले पूर्ण करायला..
.
.
.
सगळं काम झाल्यावर रंग, स्वच्छ केलेलं brush जागच्या जागेवर..
आता आवरून देणारं कोणी नाहीये.. आणि कौतुक करणारं माझं माणूस पण राहिलेलं नाहीये..

Comments

Popular posts from this blog

गोफ - गौरी देशपांडे

एकेक पान गळावया - गौरी देशपांडे

भिन्न - कविता महाजन