शतायुषी

शतायुषी







पावसाळा सुरू झाला की वृक्षारोपणा चे सार्वजनिक कार्यक्रम हाती घेतले जातात. आजकाल seedballs हा एक नवीन प्रकार ही रुजू व्हायला लागलेला आहे. वृक्षारोपण म्हटलं की एके दिवशी आधी हेरून ठेवलेल्या जागेत मिळेल ते झाड लावायचं, एक फोटो काढायचा, विषय संपला. आपण लावलेलं झाड आजूबाजूच्या जैव विविधतेशी जुळवून घेणारं आहे की नाही याचा विचारच केला जात नाही. त्यात acasia सारखी विदेशी झाडं सुद्धा लावून मोकळी झालेली आहेत लोकं. oxygen मिळतोय ना, मग अजून काय हवं म्हणे.
आपल्या परिसरातील पक्षी सुद्धा भारतीय मूळ असलेल्या झाडांवरच घरटी बांधतात, मग त्यांचाही विचार नको का व्हायला.
आता ही भारतीय झाडं कोणती, याची उत्कृष्ट माहिती मिळतेय 'शतायुषी' या पुस्तकात. पिढ्यान-पिढ्या जगणारे हे वृक्ष, म्हणून शतायुषी. त्यात चिंच आणि गोरखचिंच यांचीही माहिती मिळेल, जे मूळचे भारतीय नसूनही आता आपल्या कडील निसर्ग घटकांनी यांना आपलेसे केलेले आहे.
त्यामुळे या वर्षी वृक्षारोपण चा कार्यक्रम हाती घेण्या अगोदर 'शतायुषी' नक्की वाचा ☺️👍

पुस्तक नोंदणीसाठी लेखिकेच्या थेट निसर्गातून / Day to day nature या फेसबुक page ची खालील लिंक पहावी -

https://www.facebook.com/514448648655305/posts/1968295033270652/

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

या महिन्यात एका रविवारी तिचा call - "पुढच्या रविवारी माझ्या तिसऱ्या पुस्तकाचं प्रकाशन आहे, तुला यायचंच आहे."
आता एवढं हक्काने कोणी बोललं म्हटल्यावर, नाही म्हणायचा प्रश्न कुठे येतो 😘
आणि तरी वरती बोलणार -
"तब्येत बरी नसेल तर 4 दिवस माझ्याकडे ये राहायला" 😃

हल्ली कोणाच्या गाठी भेटी नको वाटतात, त्यात एक तब्येतीचं कारण आहेच. कोणती एखादी गोष्ट ठरवावी आणि नेमकी तब्येत खराब झाल्याने plan cancel करावे.
पण रुपाली ताई सारख्या निखळ, प्रेमळ उत्साहाच्या झऱ्याला भेटायची आतुरता जास्त होती. आणि कारण मिळालं तिच्या शतायुषी पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचं.
रक्ताच्या माणसांनी पाठ फिरवली असली तरी या रुपाली नामक निर्झराने प्रेमाने कवेत घेऊन सगळ्या दुःखाला मोकळी वाट करून दिली.

रुपाली ताई,
'थेट निसर्गातून / Day to day nature' चा मला किती फायदा झाला आहे ते मी तुला काय वेगळं सांगू. माझा आई ला निसर्गाची आवड. आई ला दुःखातून बाहेर काढून पुन्हा झाडा-फुलांमध्ये busy ठेवण्याचं काम तुझा लिखाणाने केलंय. I wish she would be here today to tell her that I met you...

तुला खूप चांगलं healthy आयुष्य लाभो रुपाली ताई. आणि नेहमी तुझा हातून असंच चांगलं content आम्हा वाचकांना मिळत राहो, हीच सदिच्छा 💕

~~~~~~~~~~~~~
बरं आता प्रकाशन सोहळ्याविषयी सांगायचं तर..

16 जून 2019, वटपौर्णिमेच्या मुहूर्तावर
साप्ताहिक विवेक (हिंदुस्थान प्रकाशन संस्था) यांनी
डॉ. उमेश मुंडल्ये यांचं 'देवराई',
 रूपाली पारखे - देशिंगकर यांचं 'शतायुषी' आणि
विवेक चा 'पर्यावरण विशेषांक'
 अशी प्रकाशन करण्यात आली.

लगे हाथो मी अजूनही विवेक प्रकाशन ची पुस्तकं उचलून आणलेली आहेत 😊

विवेक च हिरक महोत्सवी साप्ताहिक - '।। जन वन गाथा ।।'
आणि
रवींद्र गोळे यांचं 'लेण्यांच्या देशा'..


Comments

Popular posts from this blog

गोफ - गौरी देशपांडे

एकेक पान गळावया - गौरी देशपांडे

भिन्न - कविता महाजन