विकास

विकास



सगळं पटतंय, सगळं कळतंय, पण वळत काहीच नाहीये. नक्की काय वळून घ्यायचं तेच कळत नाहीये.
.
.
निसर्ग पण हवा आहे, दळणवळणाची साधनं पण हवी आहेत, विकास पण हवा आहे. पण या विकासापायी आपण आपल्याच मुळावर घाला घालत आहोत काय?
याला जबाबदार कोण? गावाकडील वाढते विकेंद्रीकरण आणि शहराकडील लोकसंख्येचे होणारे केंद्रीकरण..??!

ही लोकसंख्या शहराकडे का वाढावी? उद्योगधंदा / नोकरी..
आमच्या गावाकडे येणारे उद्योगधंदे आम्हीच आंदोलनं करून हाकलवून लावत आहोत आणि शहराकडे पळत आहोत. या शहरांत परप्रांतीय बनून राहात आहोत...
नाही का आम्ही 'परप्रांतीय'? एक प्रांत सोडून दुसऱ्या प्रांतात राहायला गेलो की दुसऱ्या प्रांतासाठी आपण परप्रांतीय च की. कोणी या पिढीत गाव सोडून आलंय, कोणी एक - दोन पिढ्या पूर्वी.. हे सगळेच परप्रांतीय!

आणि त्या दुसऱ्या प्रांतात आपल्याच सुखसोयीनसाठी विकास केला की परत आपणच विरोध करायचा, हे कसं वाटतंय??!
सगळ्याला विरोध! विरोधाला विरोध!

मग कसा उपाय काढायचा?
असच चेंगराचेंगरी त मरायचं का??
नाहीतर सगळ्याच आपल्यासारख्या परप्रांतीयांनी आपापल्याला गावात जायचं?!

तिथेच उद्योग शोधा, तिथेच राहा. सगळ्यांचे सगळेच प्रॉब्लेम solve होतील. कुठल्याच जमिनीचे भाव नाही वाढणार, कोणतीच झाडं नाही तोडली जाणार. ना रहेगा बांस, ना बजेगी बासुरी।

नुसत्या कल्पनेनेच किती बरं वाटतंय. पण खरंच असं शक्य आहे???
नाही, आता परत पाठी फिरणं शक्य नाही. असं असतं तर NRI बनून राहिलेले सगळे नाही का परत आले असते, आपापल्या गावी!!!..
.
.
.
सगळं पटतंय, सगळं कळतंय, पण वळत काहीच नाहीये...

~ सुप्रिया घुडे
०५-ऑक्टोबर-२०१९
नवरात्री सातवी माळ

Comments

Popular posts from this blog

गोफ - गौरी देशपांडे

एकेक पान गळावया - गौरी देशपांडे

भिन्न - कविता महाजन