पंचतारांकित


पंचतारांकित - प्रिया तेंडुलकर




सुप्रसिद्ध नाटककार विजय तेंडुलकर यांची कन्या - प्रिया तेंडुलकर. परंतु याहीपलीकडे तिने स्वतःची ओळख निर्माण केली ललितलेखन करणारी अभिनेत्री म्हणून.
चित्रकला, मॉडेलिंग, 5 स्टार हॉटेल मधली receptionist आणि अभिनेत्री असा प्रवास करताना स्वतःचं घडत गेलेलं व्यक्तिमत्त्व तिने 'पंचतारांकित' मध्ये शब्दबद्ध केलेलं आहे.
वडिल विजय तेंडुलकर हे प्रियाचे सर्वात जवळचे मित्र. वडिलांनी दिलेलं प्रोत्साहन, प्रत्येक कामात त्यांचा असलेला पाठिंबा, त्यांनी वेळोवेळी केलेले उपदेश तिच्या प्रत्येक लिखाणात जाणवतात.
प्रिया तिच्या मित्रासोबत वेश्यावस्तीतून सोडवून आणलेल्या २ बाल वेश्यांची कहाणी सांगते, ती खरंच हृदय पिळवटणारी आहे.
एका पंचतारांकित हॉटेल मध्ये receptionist च काम करताना आलेले कटू-गोड अनुभव खूप छान वर्णन केले आहेत. अशा हॉटेल्स मध्ये काम करणाऱ्या बायका या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ठेवलेल्या शोभेच्या बाहुल्या असतात. कधी कधी त्यांना शरीर विक्रीसाठी भाग पाडलं जातं, कधी त्या स्वतः त्या क्षेत्रात उतरतात, परिस्थितीमुळे म्हणा.
यात बरेच हात गुंतलेले असतात अगदी management level पर्यंत. अशाच एका मॅनेजर ने प्रिया ला एका Lebanese माणसाला विकायचा घाट घातला होता पण त्यातून ती कशी बाहेर पडली आणि तिने त्यावेळी घेतलेल्या धाडसी निर्णयाचं नक्कीच कौतुक वाटून राहतं.
प्रिया तेंडुलकर ह्या भारतातील पहिल्या टीव्ही-स्टार म्हणून ओळखल्या जातात. त्यांची 'रजनी' ही मालिका खूपच गाजली. 'रजनी' hit झाल्यावर चांगली आणि वाईट दोन्ही प्रकारची झालेली प्रसिद्धी वाचण्यासारखी आहे. 'मॉडेलिंग आणि मी' मध्ये एक परिच्छेद लिहिलाय त्यांनी -
"... गंमत वाटते ती याची की तरीही या व्यवसायाशी माझं नाव कायम जुळावं अशी भरीव आणि लक्षात राहण्यासारखी कामगिरी मी याही व्यवसायात केली नाही. एखाद्या चुकार, वांड मुलाला त्याच्या बापाने आयुष्यभर सांभाळून, समजून घ्यावं तसं या व्यवसायाचं आणि माझं झालेलं आहे. मी ऐंशी वर्षांची जर्जर म्हातारी होईन तेव्हाही एखाद्या केशतेलाच्या नाहीतर पाचकाच्या जाहिरातीत तोंडचं बोळकं सावरत माझे अनुभवाचे बोल सांगून मी कवळीच्या दातांनी फिस्सकन खोटी हसेन आणि ती कदाचित माझी शेवटची कमाई असेल.."
परंतु वयाच्या ४७ व्या वर्षीच, खूपच लवकर एवढ्या गोड व्यक्तीने जगाचा निरोप घेतला 😢

Comments

Popular posts from this blog

गोफ - गौरी देशपांडे

एकेक पान गळावया - गौरी देशपांडे

भिन्न - कविता महाजन