फळांमुळे आरोग्य, सौंदर्याचे संवर्धन

Published: Wednesday, January 22, 2014
विविध फळांचे भरपूर प्रमाणात व नियमितपणे सेवन केल्यास आरोग्याबरोबरच सौंदर्य वर्धन होण्यास मदत होते. फळे खात असताना आवडणारे व एकाच प्रकारचे फळ न खाता ती बदलून खाल्यास त्याचा फायदा अधिक होतो. फळामुळे इतर अन्नाच्या पचनास देखील मदत होते. अपचन व पोटाच्या इतर विकीरांचा त्रास होत असेल्यास पचन पूर्ववत्‌ करण्यासाठी दोन-तीन दिवस फलाहार करणे फायद्याचे ठरत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
वेगवेगळ्या फळांपासून मिळणारी वेगवेगळी जीवनसत्वे
आंबा - फळांचा राजा आंब्यामध्ये अ, ब व क ही तीन जीवनसत्वे मुबलक प्रमाणात असतात. मात्र, अतिप्रमाणात खाल्ल्यास त्रास देखील होण्याची शक्यता असते. उन्हाळ्यातील उष्म्याच्या त्रासापासून बचाव करण्यासाठी आंब्याचे कच्चे पन्हे उपयोगी ठरतात.
डाळिंब - डाळिंब हे फळ सौदर्य वर्धक आहे. पिकलेल्या डाळिंबाचे दाणे चेहऱ्यावर नियमितपणे चोळा, त्वचेचा रंग उजळण्यास मद होत असल्याचे आयुर्वेद सांगतो. डाळिंबाचे दाणे चावून खाल्ल्यास पोट साफ होण्.ास मदत होते.
पपई - या फळामध्ये अ, ब, क ही जीवनसत्वे भरपूर असतात. तसेच यात लोह, कॅल्शियम, फॉस्फरस कार्बोहैड्रेटस्‌चे प्रमाणही अधिक असते.
केळी - या फळात भरपूर प्रमाणात अ, ब, क, द, ई, जी, व एच्‌ ही जीवनसत्वे आहेत. यात भरपूर स्टार्च व कार्बोहैड्रेटस्‌ असतात. म्हणूनच केळे हे फळ आरोग्यवर्धक मानले जोते. अशक्त व कमी वजन असणाऱ्या व्यक्तीने नियमितपणे केळी खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. केळींमुळे प्रकृती सुधारून वजन वाढण्यास मदत होते.
सफरचंद - मानवी आरोग्य आणि सौंदर्य या दोहोंचे जतन आणि वर्धन करायचे असेल , तर रोज एक तरी सफरचंद खावे असा सल्ला दिला जातो. सफरचंदामध्ये पोटॅशियम, ग्लूकोज, फॉस्फरस, लोह, ही उपयुक्त द्रव्ये असतात. याच्या सालातही खूप महत्वपूर्ण क्षार असतात. त्यामुळे सफरचंदला आरोग्याच्या दृष्टीने फारच महत्व आहे. 
खरबूज व टरबूज - ही फळे उन्हाळ्यातच उपलब्ध असतात. व त्यांचा उपयोग उन्हाळ्याचा त्रास कमी करून गारवा देण्यासाठी होत असतो. या दोनही फळांमध्ये पाण्याचे प्रमाण अधिक प्रमाणात असल्याने ही फळे कमी उष्मांकाची असतात.
संत्रे - या फळात मुबलक प्रमाणात 'क' जीवनसत्व असते हे रेशदार फळ आहे. संत्र्याचा खाण्याबरोबरच याचा गर, रस, साल या सर्वांचा उपयोग सौंदर्य-वर्धनासाठी देखील करतात.

Comments

Popular posts from this blog

गोफ - गौरी देशपांडे

एकेक पान गळावया - गौरी देशपांडे

भिन्न - कविता महाजन