#आई_बाबा

#आई_बाबा



अजूनही असंच वाटतं, रत्नागिरी ला पोहोचलं की आई - बाबा घरात वाट पाहत असतील माझी...

फोन केला आणि बाबांनी फोन receive केला तर आवाज येईल - "नमस्कार, काय म्हणतेय, जेवलीस का??..."

आई बोलेल - "आटोपली का कामं?, काय बनवलं होतंस आज?..."

Mobile मध्ये contacts मधली 'किशोर घुडे' आणि 'शितल घुडे' नावं दिसली की कळून चुकतं, आता पुन्हा ते आवाज या numbers वरून ऐकायला नाही मिळणार...

Gate मधून आत शिरलं की, माझी आतुरतेने वाट पाहणारे ते २ चेहरे मला gallery मध्ये नाही दिसणार...

इतक्या लांबून फोनवरून सुद्धा आई ला कळायचं की काहीतरी माझं बिनसलंय..

पुण्यात hostel ला असताना, फोन वर बोलताना माझा आवाज थोडा जरी जड जाणवला की बाबा लगेच दुसऱ्या दिवशीच ticket book करायचे. आई दिवसभरात खाऊची शिदोरी तयार करून ठेवायची. मग तिसऱ्या दिवशी पहाटे बाबा, आई आणि किर्ती ला घेऊन hostel च्या gate समोर हजर असायचे...

आणि आता...
आता.. आयतं खाऊ घालणारं कोणी नाही राहिलं..
आवाज जड होतोय ते ओळखणारही कोणी नाही राहिलं...

~धुलिवंदन २०१८~


Comments

Popular posts from this blog

गोफ - गौरी देशपांडे

एकेक पान गळावया - गौरी देशपांडे

भिन्न - कविता महाजन