Untold Feelings...

खूप भीती वाटते मला हल्ली..

सगळी माझ्या जवळची माणसं नाहीशी होतं चालली आहेत..

कधी वाटतं वेड लागेल मला विचार करून..

खरंच मला फरक पडतोय का की नाही पडत आहे???

तशीही मी एकटी लांब राहतेय सगळ्यांपासून, तसाही काय फरक पडतो ना..

कधी वाटत सगळी लोकं आहेत जिवंत, बस्स मी लांब आहे म्हणून मला नाही भेटत आहेत..

म्हणजे मी सगळं assume करतेय का???

म्हणजे नक्की काय होतंय.. की मी एकटी पडलेय.. पूर्ण एकटी...

माझं मरण कसं असेल, कोणी असेल तरी का शेवटच्या क्षणी माझा सोबत, पण तसही काय फरक पडतो कोणी नसलं तरी, मी तर या जगातच नसेन..

कोणचं नव्हतं भेटलं मला शेवटच्या क्षणी, नाही बाबा नाही काका..
मला वाटलं पण नव्हतं जी भेट घेतली ती शेवटची भेट होती..

मला वेड लागेल खरंच विचार करून आता..

मामाची news ऐकून काल मी वेड्यासारखी काहीतरी timepass करत बसले, म्हणजे त्रास होत होता.. मला वाटत होतं काहीतरी..

मी दगड झालेय का, की मी स्वतःला सावरतेय,
की मला आता काहीच फरक पडत नाहीये..

मला घरची आठवण येतेय,
Hereafter I can't loose anyone .. I cant.. I can't afford to...

मला खूप भीती वाटतेय...

खूप...

मला हवेत सगळे...

मी नाही राहू शकत...

08-JAN-2018
सुप्रिया घुडे

Comments

Popular posts from this blog

गोफ - गौरी देशपांडे

एकेक पान गळावया - गौरी देशपांडे

भिन्न - कविता महाजन