नाळ


नाळ


आई - काय अद्भुत रसायन आहे यार हे. कस काय तिला माझ्या मनात काय चाललंय ते कळतं? विचारलं तर बोलते - "आई आहे तुझी मी". आता हे काय उत्तर झालं??!
समोर असताना एक वेळ समजू शकते, चेहऱ्यावरचे बदललेले expressions तिला सांगून जात असतील, काय बिनसलय ते. ( माझंही थोबाड आहेच तसं, emotions नं लपवणार 😏 ). पण, phone वर बोलत असताना कसं काय कळू शकत, काय विचार करतेय ते मी, अगदी कितीही आवाज normal ठेवून बोला?? 🙄
सगळंच अजिब-ओ-गरीब..
म्हणजे अगदी सध्या-सध्या गोष्टी -
बोलता - बोलता अचानक म्हणेल, "तुला तहान लागलीये का, जा पाणी पिऊन ये"
आता कमाल झाली, या क्षणी माझा शरीराला पाण्याची गरज आहे हे तिला कस कळावं? 🤔
अगदी भारतीय अर्थव्यवस्थेवर जरी मी चर्चा करत असेन तरी अचानक विचारेल, "कोणाशी बिनसलय का तुझं? कशावरून चिड-चिड होतेय का.?!"
आता तर म्हटलं हद्दचं झाली. आई ला कसं कळलं?? 🤔🤔🤔
गर्भाशयात असताना बाळ नाळेने आई च्या हृदयाशी जोडलेलं असतं. तेव्हा बाळाच्या हालचाली वरून आई ला कळत असेलही.
पण अगं आई, तुझं हे बाळ कधीच नाळ तोडून बाहेर आलंय, या खुल्या जगात एकटं वावरतंय..
मला अस वाटतंय, अजूनही माझी नाळ आई च्या हृदयाशी जोडलेली आहे, अप्रत्यक्ष पणे... 👩👩👧
ता. क. - सहजच Dove ची recent ad आठवली -
"आई बरोबर किंवा चुकीची नसते, आई ही फक्त आई असते"


~सुप्रिया घुडे~
09-Dec-2016


Comments

Popular posts from this blog

गोफ - गौरी देशपांडे

एकेक पान गळावया - गौरी देशपांडे

भिन्न - कविता महाजन