कुठेतरी वाचलेले - १



अश्वत्थामा, कृष्ण सखा उद्धव यासोबत द्वारकेतील समुद्रा वरील भेटीमध्ये  बोलताना..

अश्वत्थामा - उद्धवजी, सागर तुम्हाला कसा वाटतो?...
उद्धव - सागर गुरुसारखा वाटतो. त्याच्याकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे. शत योजने विस्तीर्ण असलेला आणि गहन गोष्टी असलेला सागर आपल्या पोटी अनेक रत्ने बाळगून आहे. अगणित संपत्ती त्याच्या उदरी आहे. असंख्य जलचर त्याच्या पोटी विहारताहेत. त्याच्या आकाशाला भिडण्यासाठी उसळणाऱ्या लाटा पाहून डोळे दिपतात. सागराचं अफाट बळ आणि व्याप्ती लक्षात घेता असं वाटतं की, एका क्षणात पृथ्वी आपल्या उदरात गडप करेल. पण हजारो वर्षे झाली. त्याने आपल्या मर्यादा उल्लंघल्या नाहीत. आपल्या मर्यादेच्या आतच सुखनैव गर्जतो आहे. त्याच्या पोटातील वडवानल त्याला नित्य ताप देतात, जाळतात. पण त्याच दुःख त्याच्या पृष्ठभागावर दिसत नाही. सागर स्थितप्रज्ञ योग्यासारखा आपल्या जागी अचल आहे. सागर कुणावर आक्रमण करत नाही. परवस्तू आपल्या पोटात ठेवत नाही. माणसाने सागरासारखं असावं. आपल्या मर्यादा जाणाव्यात. अपेक्षा सीमित कराव्यात. ज्याचा आपल्याला कधीही उपयोग होणार नाही अशा परावस्तूंचा हव्यास टाळावा. माणूस सुखी होऊन जाईल...

- चिरंजीव... अश्वत्थामा (लेखक - शंकर टिळवे)


Comments

Popular posts from this blog

गोफ - गौरी देशपांडे

भिन्न - कविता महाजन

एकेक पान गळावया - गौरी देशपांडे