भूमिती


↔↔↔↔↔↔↔↔↔↔

भूमिती

... नारळ पाण्याने भिजवला की कोयत्याच्या २ फटक्यात नारळाचे २ भाग वेगवेगळे होतात.
मग कोयती किंवा सुरीने हळुवार आतल्या खोबऱ्याच्या कडा काढाव्या लागतात, म्हणजे खोबरं किसताना व्यवस्थित किसलं जातं आणि कवड/करवंटी अगदी साफ होते.
खोबऱ्याच्या कडा काढताना सुरीचं टोक बरोबर मध्ये ठेवून, सूरी गोल फिरवायची म्हणजे बरोबर कडा निघतात, नं तुटता.
असलाच काहीसा प्रकार आपण शाळेत सुद्धा शिकलोय का?? 🤔
भूमिती मध्ये वर्तुळ काढताना... ??!! 🤓
कंपास चं टोक बरोबर मध्यावर ठेवून पेन्सिल चं टोक गोलवार फिरवायचं. झालं वर्तुळ ⭕
आता कळलं, भूमितीचा उपयोग स्वयंपाकघरात कसा होतोय ते???
😝🏃🍚🍛🍳🍲🌯
↔↔↔↔↔↔↔↔↔↔↔↔


~सुप्रिया घुडे~
17-Jul-2017

Comments

Popular posts from this blog

गोफ - गौरी देशपांडे

एकेक पान गळावया - गौरी देशपांडे

भिन्न - कविता महाजन